उ उ आ आ ओ ओ उ आ आ
रंग निराळे सारे गंध निराळे
मनामनात सुगंध निराळे
मुक्त आकाशी उडण्या साठी
आज मला नवे पंख मिळाले
नाचू लागले गीत नवे गुणगुणू लागले
गीत नवे स्वप्नी पांघराया लागले हा हा
रंग निराळे सारे गंध निराळे
मनामनात सुगंध निराळे
मुक्त आकाशी उडण्या साठी
आज मला नवे पंख मिळाले
भिरभिरती कसे मन फुलपाखरू जसे
दाटलेले धुके विरताना मज दिसे
पाकळी पाकळी वरी दव बिंदू होवुया
पाकळी पाकळी वरी दव बिंदू होवुया
रंगुनी सप्तरंगानी बरसुया
रंग निराळे सारे गंध निराळे
मनामनात सुगंध निराळे
मुक्त आकाशी उडण्या साठी
आज मला नवे पंख मिळाले
उ उ उ उ उ उ आ आ आ उ उ आ आ
पाहण्यास जावे वाहुनी वार् यावरी
आभाळ टेकते कोणत्या क्षितीजावरी
तारांगणी विसावण्या उंबरठा ओढिते
तारांगणी विसावण्या उंबरठा ओढिते
नशिबाची चांदणी मी शोधिते
रंग निराळे सारे गंध निराळे
मनामनात सुगंध निराळे
मुक्त आकाशी उडण्या साठी
आज मला नवे पंख मिळाले
नाचू लागले गीत नवे गुणगुणू लागले
गीत नवे स्वप्नी पांघराया लागले
रंग निराळे सारे गंध निराळे
मनामनात सुगंध निराळे
मुक्त आकाशी उडण्या साठी
आज मला नवे पंख मिळाले