दर्पणी बघते मी गोपाळा
दर्पणी बघते मी गोपाळा
साज सुगंधी करू कशाला
साज सुगंधी करू कशाला
दर्पणी बघते मी गोपाळा
दर्पणी बघते मी गोपाळा
कोमल माझ्या प्रतिबिंबातून
बिंब तयाचे बघते न्याहाळून
कोमल माझ्या प्रतिबिंबातून
बिंब तयाचे बघते न्याहाळून
नेत्र फुलांची होता पखरण
नेत्र फुलांची होता पखरण
फुलवेणी मी घालू कशाला
दर्पणी बघते मी गोपाळा
दर्पणी बघते मी गोपाळा
स्वैर अजाणु पाठीवरती
श्यामल कुरळे कुंतल रुळती
स्वैर अजाणु पाठीवरती
श्यामल कुरळे कुंतल रुळती
सुंदरतेला मिळता मुक्ती
सुंदरतेला मिळता मुक्ती
मोहबंधनी बांधू कशाला
दर्पणी बघते मी गोपाळा
दर्पणी बघते मी गोपाळा
भरता चिंतन नयनी अंजन
गोविंदाचे घडता दर्शन
भरता चिंतन नयनी अंजन
गोविंदाचे घडता दर्शन
भक्तीचे हे बांधून पैंजण
भक्तीचे हे बांधून पैंजण
लोकरंजनी नाचू कशाला
दर्पणी बघते मी गोपाळा
दर्पणी बघते मी गोपाळा
साज सुगंधी करू कशाला
दर्पणी बघते मी गोपाळा