हे असेच स्वप्न राहू दे
हे असेच स्वप्न राहू दे
लोचने भरून पाहू दे
वंचना सले मनात
ही अशीच प्रीत गाऊ दे
अशीच प्रीत गाऊ दे
गाऊ दे
हे असेच स्वप्न राहू दे
मी अबोल राहिले दुःख हे अजाणते
नकळता घडे तरी हा प्रमाद जाणते
संभ्रमात मी अजून हे धुके विरून जाऊ दे
धुके विरून जाऊ दे
जाऊ दे
हे असेच स्वप्न राहू दे
काय दैव बापुडे आज मी अशी सुकी
काय दैव बापुडे आज मी अशी सुकी
लाभले मला परी मी सुखाचं पारखी
एकदाच गहिवरून या दवांत चिंब न्हाऊ दे
दवांत चिंब न्हाऊ दे
न्हाऊ दे
]हे असेच स्वप्न राहू दे
हे असेच स्वप्न राहू दे
हे असेच स्वप्न राहू दे
हे असेच स्वप्न राहू दे