दिवसामागूनि दिवस चालले
ऋतू मागूनी ऋतू
जिवलगा कधि रे येशील तू
जिवलगा कधि रे येशील तू
जिवलगा कधि रे येशील तू
धरेस भिजवुन गेल्या धारा
फुलून जाइचा सुके फुलवरा
धरेस भिजवुन गेल्या धारा
फुलून जाइचा सुके फुलवरा
नभ धरणीसी जोडुन गेले सप्तरंग सेतू
कधि रे येशील तू जिवलगा
कधि रे येशील तू
शारदशोभा आली गेली
रजनीगंधा फुलली सुकली
शारदशोभा आली गेली
रजनीगंधा फुलली सुकली
चंद्रकलेसम वाढुन विरले अंतरीचे हेतू
कधि रे येशील तू जिवलगा
कधि रे येशील तू
पुनरपि ग्रीष्मी तीच काहीली
मेघावली नभि पुनरपि आली
पुनरपि ग्रीष्मी तीच काहीली
मेघावली नभि पुनरपि आली
पुनश्च वर्षा लागे अमृत
पुनश्च वर्षा लागे अमृत विरहावर ओतू
कधि रे येशील तू जिवलगा
कधि रे येशील तू जिवलगा
कधि रे येशील तू