उजळू स्मृती कशाला आ आ
उजळू स्मृती कशाला अश्रूंत दाटलेली
सांगू कशी कहाणी स्वप् नांत रंगलेली
उजळू स्मृती कशाला
आतूर लोचनांचे ते लाजरे बहाणे
मौनात साठलेले हितगूजही दिवाणे
नाती मनामनाची भाषेविनाच जुळली
सांगू कशी कहाणी स्वप् नांत रंगलेली
उजळू स्मृती कशाला
ते फूल भावनेचे कोषांत आज सुकले
संगीत अंतरीचे ओठीं विरून गेले
हृदयास जाळणारी आता व्यथाच उरली
सांगू कशी कहाणी स्वप् नांत रंगलेली
उजळू स्मृती कशाला आ आ आ आ
तू दाविलेस सखया मज चित्र नंदनाचे
उधळून तेच गेले संचित जीवनाचे
आता कुठे किनारा माझी दिशाच चुकली
सांगू कशी कहाणी स्वप् नांत रंगलेली
उजळू स्मृती कशाला आ आ