दूर कुठे राउळात दरवळतो पूरिया
दूर कुठे राउळात दरवळतो पूरिया दरवळतो पूरिया
असह्य एकलेपणा आस आसवी मिळे
काय अंतरात ते अजून ना कुणा कळे
काय अंतरात ते अजून ना कुणा कळे
झाकळून जाय गाव ये तमास पूर या
दरवळतो पूरिया
दरवळतो पूरिया
दूर वास रे तुझा ध्यास लागला मनी
दृष्टिभेटही नसे काय सांगणे जनी
एकवार तूच ये सखीस धीर द्यावया
दरवळतो पूरिया
दरवळतो पूरिया
सलत सूर सनईचा वारियात कापरा
सुकून पाकळी मिटे मूक भाव लाजरा
फुलांत गंध कोंदला वाट ना उरे तया
दरवळतो पूरिया
दूर कुठे राउळात दरवळतो पूरिया पूरिया