मेरी झांसी नही दूंगी
मेरी झांसी नही दूंगी हे बोल जिथे घुमती
तिथे लवे ही मान हिंदवी गात तिची कीर्ती
मेरी झांसी नही दूंगी
बीज मराठी बाणा कणखर
बीज मराठी बाणा कणखर
सत्तांधाशी देई टक्कर आ आ आ आ
सत्तांधाशी देई टक्कर
अजून दिसे पडक्या बुरुजावर आ आ आ आ
अजून दिसे पडक्या बुरुजावर
उभी ठाकली मर्दानी ती शुभ्रकमल मूर्ती
मेरी झांसी नही दूंगी
स्वातंत्र्याच्या या तीर्थावर
स्वातंत्र्याच्या या तीर्थावर
शुभ्रकमल हे फुले निरंतर
शुभ्रकमल हे फुले निरंतर
इथेच अवघ्या चराचरावर
इथेच अवघ्या चराचरावर बोल तिचे घुमती
मेरी झांसी नही दूंगी