दिव्यत्वाची जेथ प्रचीती
दिव्यत्वाची जेथ प्रचीती
तेथे कर माझे जुळती
तेथे कर माझे जुळती
गाळुनिया भाळींचे मोती
हरीकृपेचे मळे उगविती
जलदांपरि येउनिया जाती
जलदांपरि येउनिया जाती
जग ज्यांची न करी गणती
तेथे कर माझे जुळती
तेथे कर माझे जुळती
यज्ञी ज्यानी देउनि निजशीर
घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभूमिवर
परी जयांच्या दहनभूमिवर
नाही चिरा नाही पणती
तेथे कर माझे जुळती
तेथे कर माझे जुळती
जिथे विपत्ति जाळी उजळी
निसर्ग लीला निळी काजळी
कथुनि कायसे काळिज निखळी
कथुनि कायसे काळिज निखळी
एकाची सगळी वसती
तेथे कर माझे जुळती
तेथे कर माझे जुळती
मध्यरात्री नभघुमटाखाली
शांतिशिरी तम चवर् या ढाळी
त्यक्त बहिष्कृत मी ज्या काळी
त्यक्त बहिष्कृत मी ज्या काळी
एकांती डोळे भरती
तेथे कर माझे जुळती
तेथे कर माझे जुळती