तू दूर दूर तेथे हुरहुर मात्र येथे
तू दूर दूर तेथे हुरहुर मात्र येथे
विरहात रात्र मोठी प्रेमी जनास वाटे
तू दूर दूर तेथे हुरहुर मात्र येथे
शब्दात सांगु कैसे ते दुःख अंतरीचे
ओलावले दवात हे काठ पापण्यांचे
भरला स्वरात कंप
भरला स्वरात कंप कंपात भाव दाटे
तू दूर दूर तेथे हुरहुर मात्र येथे
मी भाबडी मनाची आहेच स्वप् नवेडी
मी भाबडी मनाची आहेच स्वप् नवेडी
विरुनी तुझ्यात जावे ही एक आस वेडी
राहो अभंग प्रीती
राहो अभंग प्रीती राहो अभंग नाते
तू दूर दूर तेथे हुरहुर मात्र येथे
भाळावरी असे हे सौभाग्य लाल कुंकू
विक्राळ काळ येता दोघे तयास जिंकू
स्फुरता मनात आशा
स्फुरता मनात आशा ओठांत गीत येते
तू दूर दूर तेथे हुरहुर मात्र येथे