या सुखांनो या या सुखांनो या या सुखांनो या
एकटी पथ चालले दोघांस आता हात द्या साथ द्या
या सुखांनो या
विरहांतीचा एकान्त व्हा अधीर व्हा आलिंगने
गालीओठी व्हा सुखांनो भाववेडी चुंबने
होउनी स्वर वेळूचे वार्यासवे दिनरात या गात या
या सुखांनो या
आमुच्या बागेत व्हा लडिवाळ तुम्ही पाखरे
शयनघरच्या या छताची व्हा रुपेरी झुंबरे
होऊ द्या घर नांदते
होऊ द्या घर नांदते तुम्हीच त्यांना घाट द्या थाट द्या
या सुखांनो या
अंगणी प्राजक्त व्हा सौधावरी व्हा चांदणे
जोडप्याचे गुज जुईचे चिमुकल्यांचे रांगणे
यौवनी सहजीवनी
यौवनी सहजीवनी दोन्ही मनांचे गीत व्हा प्रीत व्हा
या सुखांनो या या सुखांनो या या सुखांनो या