[ Featuring Pankaj Udhas ]
हम्म हम्म हम्म हम्म ला ला ला ला ला
झर झर झर झर रिमझिमणारा पाऊस होशील ना
थरथरणाऱ्या पानांवरती चाहूल देशील ना
तुझ्या आसमंती मी बांधला ग रंगधनु चा झुला
मातीतला गंध श्वासात माझ्या हलकेच भरशील ना
झर झर झर झर रिमझिमणारा पाऊस होशील ना
कितीदा जुन्या प्रेम पत्रात शोधू तुझा चेहरा लाजणारा
तुला पाहिले अन हरवून गेले विसरून गेले स्वतःला
शब्दांविना सारे कळले इशारे नवा अर्थ यावा सुखाला
झर झर झर झर रिमझिमणारा पाऊस होशील ना
प नि सा प नि सा प नि सा ग रे (हम्म हम्म हम्म)
प नि सा प नि सा प नि सा प म (हम्म हम्म हम्म)
मनाचे मनाशी धागे जुळावे विणू रेशमी बंध हा
आपल्या कहाणीत वळ्णावरी एक शोधू हवासा विसावा
गंधाळणारा नादावणारा ऋतू सोबतीला असावा
झर झर झर झर रिमझिमणारा पाऊस होशील ना
थरथरणाऱ्या पानांवरती चाहूल देशील ना
हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म
हम्म हम्म हम्म हम्म हम्म हम्म