आ आ आ आ देशिल का रे मजला क्षणभर
पंख पाखरा तुझे मनोहर
देशिल का रे मजला क्षणभर
पंख पाखरा तुझे मनोहर देशिल का रे
मधुर फळांवर मोहरलेली
मधुर फळांवर मोहरलेली
पर्णांतरी ही पल्लवलेली
चुंबीत राहीन लज्जीत लाली
तुझ्यासवें मी वृक्षलतेवर
देशिल का रे मजला क्षणभर
पंख पाखरा तुझे मनोहर देशिल का रे
तव स्पर्शाने पुष्पकवीणा
तव स्पर्शाने पुष्पकवीणा
भाव मधुर ही सुस्वरताना
हास्य सुगंधीत सख्या मोहना
उधळीत राहू प्रीत फुलावर
देशिल का रे मजला क्षणभर
पंख पाखरा तुझे मनोहर देशिल का रे
दमयंतीच्या प्रेमळ दूता
दमयंतीच्या प्रेमळ दूता
पंख तुझे ते मला लाभता
प्रिया भेटण्या ही आतुरता
घेत भरारी बघ वायुवर
देशिल का रे मजला क्षणभर
पंख पाखरा तुझे मनोहर देशिल का रे