धुंद मधुमती रात रे
धुंद मधुमती रात रे नाथ रे
हो धुंद मधुमती रात रे नाथ रे
तनमन नाचे यौवन नाचे
तनमन नाचे यौवन नाचे
उगवला रजनीचा नाथ रे नाथ रे नाथ रे
हो धुंद मधुमती रात रे नाथ रे
जललहरी या धीट धावती हरित तटाचे ओठ चुंबिती ओठ चुंबिती आ आ आ आ
येई प्रियकरा येई मंदिरा येई मंदिरा
अलि रमले कमलांत रे नाथ रे
हो धुंद मधुमती रात रे नाथ रे
आ आ आ आ ये रे ये का मग दूर उभा
ये रे ये का मग दूर उभा ही घटिकाही निसटुनी जायची
फुलतील लाखो तारा
फुलतील लाखो तारा परि ही रात कधी कधी ना यायची
आ आ आ आ चषक सुधेचा ओठी लावुनि ओठी लावुनि
कटी भवती धरी हात रे नाथ रे
हो धुंद मधुमती रात रे नाथ रे
हो धुंद मधुमती रात रे नाथ रे