घेऊ कसा उखाणा घेऊ कसा उखाणा
घेऊ कसा उखाणा घेऊ कसा उखाणा
का लाजले अशी मी का लाजले अशी मी
माझे मला कळेना
घेऊ कसा उखाणा घेऊ कसा उखाणा
माझ्या मनोमनी मी कमलापरी फुलावे
या कमललोचनांनी कमलावरा पहावे
शुभनाम या प्रभूचे का ठाउके न कोणा
घेऊ कसा उखाणा घेऊ कसा उखाणा
स्पर्शातल्या सुधेने हे अंग अंग न्हाले
या रम्य दर्शनाने डोळे कृतार्थ झाले
शब्दांत काय सांगू छेडून भाववीणा
घेऊ कसा उखाणा घेऊ कसा उखाणा
मज रूप लक्ष्मीचे मज रूप लक्ष्मीचे
तू नाथ शेषशायी
माझी अनन्य प्रीती झाली विलीन पायी
माझ्यापुढे उभा तू साक्षात देवराणा
घेऊ कसा उखाणा घेऊ कसा उखाणा
का लाजले अशी मी का लाजले अशी मी
माझे मला कळेना
घेऊ कसा उखाणा घेऊ कसा उखाणा
घेऊ कसा उखाणा घेऊ कसा उखाणा