हसतेस अशी का मनी
हसतेस अशी का मनी
कोण गं उभे तुझ्या अंगणी
कितीकदा वळून पाहसी
कितीकदा वळून पाहसी
अन पुन्हा नजर वळविशी
अन पुन्हा नजर वळविशी
हा लपंडाव खेळसी
कोण गं उभे तुझ्या अंगणी
हसतेस अशी का मनी
कोण गं उभे तुझ्या अंगणी
अडविशी मुखावर हसे
अडविशी मुखावर हसे
थरकाप हृदयी होतसे
थरकाप हृदयी होतसे
लागले कुणाचे पिसे
कोण गं उभे तुझ्या अंगणी
हसतेस अशी का मनी
कोण गं उभे तुझ्या अंगणी
वळते न जीभ का मुकी
रिक्तमा पसरते मुखी
रेखिले चित्र हे कुणी
कोण गं उभे तुझ्या अंगणी
हसतेस अशी का मनी
कोण गं उभे तुझ्या अंगणी
कोण गं तेच का गडे
कोण गं तेच का गडे
पण कशास हो एवढे
पण कशास हो एवढे
अगबाई मुळी न आवडे
अगबाई मुळी न आवडे
नव्हे का नाव ही ते भाषणी
कोण गं उभे तुझ्या अंगणी
हसतेस अशी का मनी
हसतेस अशी का मनी
कोण गं उभे तुझ्या अंगणी