झूळ झूळ वाहे पुण्य जळाचा निर्जर हो निर्जर हो
श्री विघ्नेशर सदन शुभंकर ओजर हो ओजर हो
झूळ झूळ वाहे पुण्य जळाचा निर्जर हो
श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओजर हो
गणरायाला विग्नासुर ये शरण जिथे
गणरायाला विग्नासुर ये शरण जिथे
भक्तजनांना भय दावील का मरण तिथे मरण तिथे
हे विघ्नेश्वर चरण दयेचे पाझर हो पाझर हो
श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओजर हो
कृष्ण शिळेचा मूषक धावे दाराशी
कृष्ण शिळेचा मूषक धावे दाराशी
तैशा पळती भक्तांच्या संकट राशी संकट राशी
भवे चिरांचे मंदिर हे चीर सुंदर हो सुंदर हो
श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओजर हो
झूळ झूळ वाहे पुण्य जळाचा निर्जर हो निर्जर हो
श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओजर हो ओजर हो