एक संगीतकार ह्या नात्याने माझ्या चालीने
अनेक गायक गायिकाना शिकवलेला आहे
या अनेक गायकांनी माझी गीत गायली आहेत
जग विख्यात गायिका लता मंगेशकर
यांनी कामापुरता मामा या चीत्रापटा साठी पार्श्व गायन केल
आणि त्यात जीवानात ही घडी अशीच राहू दे
हे मी लिहलेल आणि स्वरबद्ध केलेल गीत अतिशय लोक प्रिय झाल
माझे काही मित्र मनडळी विचारतात काहो लता बाईना तुम्ही शिकवलत
किती वेळ लागला गाण बसवायला
माझ्या मित्रांना एक उदहरण देऊन सांगतो
आपण आरश्य समोर उभ राहल्यावर आपला प्रतिबिंब यायला किती वेळ लागतो
बस तेवढाच वेळ लता बाईना आत्मा साध करायला लागला
तर ऐकुया लता बाईचा लागावी आवाज
जीवनात ही घडी अशीच राहू दे
जीवनात ही घडी अशीच राहू दे
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे
जीवनात ही घडी अशीच राहू दे
जीवनात ही घडी अशीच राहू दे
रंगविले मी मनात चित्र देखणे
रंगविले मी मनात चित्र देखणे
आवडले वेडीला स्वप्न खेळणे
स्वप्नातील चांदवा
स्वप्नातील चांदवा जीवास लाभू दे
जीवनात ही घडी अशीच राहू दे
हळुच तुला बघण्याचा छंद आगळा
हळुच तुला बघण्याचा छंद आगळा
लज्जेचा त्याविण का
लज्जेचा त्याविण का अर्थ वेगळा
स्पर्शातुन अंग अंग धुंद होऊ दे
जीवनात ही घडी अशीच राहू दे
पाहु दे असेच तुला नित्य हासता
जाऊ दे असाच काळ शब्द झेलता
मिलनात प्रेमगीत धन्य होऊ दे
जीवनात ही घडी अशीच राहू दे
जीवनात ही घडी अशीच राहू दे