मंदिरे सुनी सुनी
मंदिरे सुनी सुनी कुठे न दीप काजवा
मेघवाहि श्रावणात ये सुगंधी गारवा
मंदिरे सुनी सुनी
सुनी सुनी सुनी सुनी
रात सूर पेरुनी अशी हळूहळू भरे
रात सूर पेरुनी अशी हळूहळू भरे
समोरच्या धुक्यातली उठून चालली घरे
समोरच्या धुक्यातली उठून चालली घरे
मंदिरे सुनी सुनी
सुनी सुनी सुनी सुनी
गळ्यात शब्द गोठले अशांतता दिसे घनी
गळ्यात शब्द गोठले अशांतता दिसे घनी
दुःख बांधुनी असे क्षितीज झाकिले कुणी
दुःख बांधुनी असे क्षितीज झाकिले कुणी
मंदिरे सुनी सुनी
सुनी सुनी सुनी सुनी
एकदाच व्याकुळा प्रतीध्वनीत हाक दे
एकदाच व्याकुळा प्रतीध्वनीत हाक दे
देह कोसळून हा नदीत मुक्त वाहू दे
देह कोसळून हा नदीत मुक्त वाहू दे
मंदिरे सुनी सुनी
सुनी सुनी सुनी सुनी