फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा
फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा
कुणी तरी माझे बाळ आणा बाळ आणा
फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा
रेशमाचे कुंची झबले
या हातांनी मी शिवलेले
तसेच हाती राहुन गेले
तसेच हाती राहुन गेले
घालुनी पाहू आता कुणा आता कुणा
फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा
बाळ निजेची वेळ येते
पाळण्याची दोरी हलते
गहिवरता मी जो जो म्हणते
गहिवरता मी जो जो म्हणते
पाळणा हाले सुना सुना सुना सुना
फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा
बाळ कुशीला देण्यासाठी
चिमणे चुंबन घेण्यासाठी
जितुके जीवन असेल गाठी
जितुके जीवन असेल गाठी
देईन तुजला दया घना दया घना
फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा
कुणी तरी माझे बाळ आणा बाळ आणा
फुटतो पान्हा पुन्हा पुन्हा