रम्य अशा स्थानी रहावे रात्रंदिन फुलुनी
रम्य अशा स्थानी रहावे रात्रंदिन फुलुनी
रम्य अशा स्थानी
आआआआआ
मंजुळ घंटा सांज-सकाळी
गोकुळ गीतें गातील सगळी
मंजुळ घंटा सांज-सकाळी
गोकुळ गीतें गातील सगळी
होउनी स्वप्नी गौळण भोळी वहावे यमुनेचे पाणी
रम्य अशा स्थानी
रंगवल्लिका उषा रेखिते
सिंदुर भांगी संध्या भरते
रात्र तारका दीप लावते पहावे अनिमिष तें नयनी
रम्य अशा स्थानी
आआआआआ
वैर पवन मग होईल विंझण
चंद्रकोर धरी शुभ निरांजन
वैर पवन मग होईल विंझण
चंद्रकोर धरी शुभ निरांजन
सृष्टीसखीची होउनि मैत्रिण फिरावे गात गोड गाणी
रम्य अशा स्थानी रहावे रात्रंदिन फुलुनी
रम्य अशा स्थानी