झोका येई झोका जाई
झोका येई झोका जाई
झुले पालन बालरूपी
झुले पालन बालरूपी
आईची ही पुण्याई
झोका येई झोका येई झोका जाई
हळुहळु उमले कांती कोमल
हळुहळु उमले कांती कोमल
बालमनाचा फुलतो परिमल
झुळझुळते जावळ कुरळे
झुळझुळते जावळ कुरळे
बघ वारा चुंबित राही
झोका येई झोका येई झोका जाई
पापणीची चवरी ढळता
पापणीची चवरी ढळता
शुभं करोती नीज बोलता
सुख इवले बघुनि निजले
सुख इवले बघुनि निजले
दुःख माझे जो जो गाई
झोका येई झोका येई झोका जाई
झुले पालन बालरूपी
आईची ही पुण्याई
झोका येई झोका येई झोका जाई