कानात सांग माझ्या, मी आवडे तुला का
कानात सांग माझ्या, मी आवडे तुला का
माझी अबोल प्रीति नयनां तुझ्या कळे का
कानात सांग माझ्या
नयनांत माझिया हे मंदिर यौवनाचे
नयनांत माझिया हे मंदिर यौवनाचे
मी न्याहळून बघते मूर्तित रूप तव ते
फूलमाळ गुंफलेली कंठी तुझ्या पडे का
कानात सांग माझ्या मी आवडे तुला का
कानात सांग माझ्या
मी ज्योत प्रीतिची ही जळते तुझ्याचसाठी
मी ज्योत प्रीतिची ही जळते तुझ्याचसाठी
होऊन तू पतंग घे झेप भेटीसाठी
सद्भाग्य हे सुखाचे नशिबी तरी असे का
कानात सांग माझ्या मी आवडे तुला का
कानात सांग माझ्या
मी बासरी परि त्या ओठी तुझ्या रहावे
मी बासरी परि त्या ओठी तुझ्या रहावे
सूरांसवे सुगंधी धुंदीत गात जावे
हे स्वप् न अंतरीचे होईल पूर्ण कधी का
कानात सांग माझ्या मी आवडे तुला का
माझी अबोल प्रीति नयनां तुझ्या कळे का
कानात सांग माझ्या, मी आवडे तुला का
कानात सांग माझ्या