आई अग आई
करू काय सुचेना
अश्रू कुणी पुसेना
करू काय सुचेना
अश्रू कुणी पुसेना
हा तुझा अबोला
मला सोसवेना
तू जीव प्राण माझे
तू सर्व भान माझे
तुझ्या एका हाकेसाठी
झुरे जीव माझा
आई अग आई
रुसलीस का बोल ना
आई अग आई
रुसलीस का बोल ना
आ आ आ आ आ
ओंजळीच्या पाळण्यात
शेज माझी सजलेली
जगण्याची आस तुझ्या
पदराशी बांधलेली
ओंजळीच्या पाळण्यात
शेज माझी सजलेली
जगण्याची आस तुझ्या
पदराशी बांधलेली
सोबतीला आहे जणू
तुझ्या मायेची सावली
गाऊनी अंगाई आई
परीकथा सांग ना
आई अग आई
रुसलीस का बोल ना
बोल ना आ आ ग बोल ना
हात तुझा हाती होता
म्हणुनी मी सावरलो
बोल बोबडाले माझे
तुझ्या मुखाने बोललो
हात तुझा हाती होता
म्हणुनी मी सावरलो
बोल बोबडाले माझे
तुझ्या मुखाने बोललो
तुझ्या नजरेने माझे
जग पाहिले मी आई
कसे फेडू पांग तुझे
कसा होऊ उतराई
उघडूनी डोळे आई
तूच आता सांग ना
आई रुसलीस का बोल ना
आई आई रुसलीस का बोल ना
आई अग आई
रुसलीस का बोल ना